पुणे: पुणे शहरात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत वखार महामंडळाजवळ हि गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जुन्या वादातून मोजेश शेखापुरे या युवकावर गोळीबार केला होता. या घटनेबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेट परिसरात लपून बसले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसर चारही बाजूंनी घेरून छापा टाकला. पोलिसांनी अचानक झडप घालून दोन्ही आरोपींना कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीतून गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींची नावेही निष्पन्न झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

