Dailyhunt
पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे.

पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे.

पुणे : पुणे शहरात स्वतःला 'दादा' समजत दहशत माजवणाऱ्या सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकाचवेळी नऊ गुंडांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्ड तसेच शहरातील इतर संवेदनशील भागात या गुन्हेगारांची दहशत होती. किरकोळ कारणावरून मारहाण, धमकी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे असे गंभीर गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल आहेत. गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेत तडीपारीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये जालिंदर मसा मोरे (वय 48, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय 26, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय 23, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय 22, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय 21), कृष्णा बबन लोखंडे (वय 24), आर्यन बापु बेलदरे (वय 24, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय 33, रा. मार्केटयार्ड) आणि साहिल भिमा अष्टगे (वय 20 , रा. मार्केटयार्ड) यांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने या सर्व गुन्हेगारांची सखोल माहिती गोळा करून, त्यांच्याविरोधातील गुन्ह्यांचा अभ्यास केला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले असून, शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; 'सदैव एकनिष्ठ' स्टेटस ठेवणारा गजाआड…

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…

पुणे! घरी सांगितले चेन्नईला जातोय अन् २४व्या मजल्यावरून मारली उडी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka