Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी.

पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी.

पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील युवतीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली. कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या युवतीने आपल्यावर बुधवारी (ता. २) अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. तक्रारीवरून संभ्रम निर्माण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी कडक अॅक्शन घेतली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित युवक हा 'कुरिअर कंपनीतील कर्मचारी' नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे, घटनेतील 'कुरिअर बॉय'ची कथा आता वेगळीच असल्याचे समोर आले आहे. युवतीने मुद्दामहून तरुणाला जाळ्यात अडकवले अन् त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर आता पोलिसांनी समोरासमोर बसून चौकशी केल्यानंतर आता युवतीने आपणच सगळं कृत्य केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात संबंधित मित्राला तात्काळ अटक केली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. "या प्रकरणात मित्राला अटक करण्यात येणार नाही. पोलिसांनी तपासात सहकार्य करावे, तसेच तपासकामी बोलावण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. युवकाला पुणे शहराबाहेर जाण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka