Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! मुलांना भेटण्यासाठी जावयाला बोलावलं अन् घेऊन गेले निर्जनस्थळी.

पुणे! मुलांना भेटण्यासाठी जावयाला बोलावलं अन् घेऊन गेले निर्जनस्थळी.

पुणे : मुलांची ओढ लागल्याने भेटायला आलेल्या बापासोबत पत्नीसह त्याच्या सासरच्या मंडळींनी धक्कादायक कृत्य केले आहे. सासरच्या मंडळींनी निर्जनस्थळी घेऊन जात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात उघडकीस आली आहे.

पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत असलेल्या या व्यक्तीला मुलांच्या भेटीचे आमिष दाखवून सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेऊन दगड आणि बांबूने मारहाण करण्यात आली. नारायण पांडुरंग जानकर (वय ४८, रा. किष्किंधानगर, कोथरूड) हे सध्या आपल्या पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून मुलांची भेट न झाल्याने त्यांनी आपल्या मेहुण्याशी (महेश बावदाने) संपर्क साधला आणि मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मेहुण्याने त्यांना भेटीसाठी कर्वे रस्ता परिसरात बोलावले.

नारायण जानकर कर्वे रस्त्यावर पोहोचताच तिथे त्यांची पत्नी मयुरी आणि इतर नातेवाईकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना रिक्षात बसवून "मुलांना भेटायला नेतो" असे सांगत सुतारदरा येथील एका मोकळ्या मैदानात नेले. तिथे सासरच्या सहा जणांनी मिळून त्यांना दगड आणि बांबूने बेदम मारहाण केली.

याप्रकरणी नारायण जानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिसांनी पत्नी मयुरी जानकर, मेव्हणे सुरेश आणि महेश बावदाने यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून एका बापाला आपल्याच मुलांना भेटण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या या हिंसक कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्…

पुणे बॉम्ब प्रकरण! आरोपीचा 'क्लीन शेव्ह'चा फंडा अन् उपचारासाठी…

पुणे! आळंदी परिसरात घरात घुसून सामूहिक लैंगिक अत्याचार…

पुणे! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने केला खून; आरोपी जेरबंद…

पुणे! युवतीची अनैतिक संबंध अन् आर्थिक वादातून हत्या; पोलिसांनी लावला छडा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka