Dailyhunt
पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी.

पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी.

पुणे : पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्ये प्रकरणात पत्नी चैतालीसह तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी सिद्धार्थ दीपक पवार याला अटक करून बुधवारी (ता. 29) न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाने चैताली आणि दीपक या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून केल्याची माहिती पत्नी चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून दिली होती. चिंचवड येथील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी चैतालीला अटक केली होती. मात्र, पोलिसांना या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावा, अशी शंका होती. त्यानुसार पोलिसांनी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र, यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सर्व सत्य समोर आले आहे.

चैताली हिने आपणच नकुलचा गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र तपासामध्ये दोघांनी खून केल्याचे समोर आले. ज्या ओढणीने नकुलचा गळा आवळला, ती ओढणी सिद्धार्थ जाळून टाकणार होता. कारण तिला नकुलच्या घामाचा वास लागला होता. त्यामुळे चैतालीने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला, ती जप्त करण्यासाठी चैतालीला पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

सिद्धार्थ-चैतालीच्या प्रेमसंबंधावरून नकुलशी वाद होत होते. प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने दोघांनी नकुलला कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहिती नकुल यांना मिळाली होती. त्यावरून भांडणे झाली. यावेळी नकुलने तिला मारहाण केली. तिला मारहाण झाल्याने प्रियकर सिद्धार्थचा राग अनावर झाला. दोघांनी संगनमताने ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केला. चिंचवड पोलिसांच्या तपासामुले हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आले असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पुणे! नकुल भोईर हत्याकांडाचा झाला उलगडा; पत्नीचा प्रियकर…

पुणे! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नीला साथ देणारा अटकेत…

पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…

पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…

पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…

Loading…

The post पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka