Dailyhunt
पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती.

पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती.

पुणे: राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रत्यक्षात ऋषिराज सावंत हे आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे तपासात समोर आले.

ऋषिराज सावंत सोमवारी दुपारी पुण्यातील विमानतळावरुन खासगी चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाले होते. मात्र त्याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांचे चार्टर्ड प्लेन माघारी वळवण्यात आले. त्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात आले होते. याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेकुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार ते बँकॉकसाठी निघालेले विमान परत कसे आणण्यात आले. या सर्व घटनाक्रमाचा आम्ही तपास करत आहोत. तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली होती. ती अपहरणाची तक्रार अद्यापपर्यंत मागे घेण्यात आलेली नाही. ऋषिराज सावंत यांचे विमान जर देशाच्या बाहेर गेले असते तर ते वळवणे अवघड झाले असते. ऋषिराज सावंत यांच्या अपहरण संदर्भात तपासात काहीही आढळलेले नाही.’

‘ऋषिराज सावंत बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला निघाले होते का, हे अद्यापपर्यंत समोर आले नाही. त्या दिवशी तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत होते. काही घटना घडण्याआधी पुणे पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता, त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आले. सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत,’ असेही पुणे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

The post पुणे पोलिस आयुक्तांनी ऋषिराज सावंत बाबत दिली महत्त्वाची माहिती… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka