Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई.

पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई.

पुणे : पुणे पोलिस प्रशासनाने कुख्यात बंडू आंदेकर याच्या नागझरी नाल्यावरील बेकायदा मासळी बाजारावर मोठी कारवाई केली आहे. मासळी बाजारची अधिकृत इमारत उपलब्ध असूनही, आंदेकरच्या वरदहस्ताने नाल्यावर अतिक्रमण करून हा बाजार अनेक वर्षांपासून चालवला जात होता.

या कारवाईने प्रशासनाने आंदेकरच्या मनमानीला लगाम घालण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.

पुणे महापालिकेने मासळी बाजारासाठी सुसज्ज इमारत बांधली आहे. मात्र, या इमारतीत व्यवसाय करण्याऐवजी अनेक मासळी विक्रेते बंडू आंदेकरच्या आशीर्वादाने नागझरी नाल्यावरच आपले स्टॉल लावत होते. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, तसेच परिसरातील अस्वच्छताही वाढत होती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या अवैध बाजारामुळे आंदेकरला नियमितपणे मोठा आर्थिक फायदा होत होता. याच मार्केटमधून बंडू आंदेकर दहशतीच्या जोरावर महिन्याला 35 लाख रुपये कमवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर मासळी विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांनी या कारवाईचा निषेध करण्यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. जर प्रशासनाने त्यांची मागणी मान्य केली नाही, तर थेट महापालिकेच्या इमारतीसमोरच मासळी विकण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही विक्रेत्यांनी दिला आहे. प्रशासनाने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरात बेकायदा व्यवसाय चालू दिला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईमुळे आंदेकरच्या आर्थिक स्त्रोताला मोठा धक्का बसला असून, त्याचे साम्राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बंडू आंदेकर याने कोर्टात मोठा दावा केला आहे. पोलिसांकडून आपल्याला बेदम मारहाण केल्याचे त्याने कोर्टात सांगितले आहे. शिवाय पोलिसांनी गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचे देखील सांगितले. कृष्णाला पोलिसांसमोर हजर व्हायला सांग, नाहीतर त्याला गोळ्या घालतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकरने केला आहे. एवढंच नव्हे तर पोलिस आम्हाला पोलिस कोठडीमध्ये त्रास देत आहेत. मागील 4 ते 5 दिवसांपासून पोलिसांनी आम्हाला आंघोळ करू दिली नाही, ब्रश करू दिला नाही, असाही दावा केला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने काल सुरुवातीला अटक केलेल्या 8 आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

The post पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka