Dailyhunt
पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई.

पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई.

पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.

पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल तब्बल 9000 लिटर दारू जप्त केली आहे. पुणे शहराजवळ तब्बल 9 हजार लिटर दारू केली जप्त आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान पुणे शहराजवळ पोलिसांनी मोठा दारूसाठा जप्त केला आहे. ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलिसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. सोरतापवाडी भागात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. एका कारवाईत पोलिसांनी 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाइत 9 हजार लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त केले. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे पाच हजार लिटर रसायन जप्त केलं आहे.

धडाकेबाज कारवाया…
ड्रग्स कारवाई नंतर आता पोलिसांनी अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत 995 लीटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. भरारी पथकाने13 फेब्रुवारी आणि14 फेब्रुवारी या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 5 वारस आणि 3 बेवारस अशा 8 गुन्ह्यांची नोंद करून 995 लिटर गावठी हातभट्टी दारू, 25 हजार लिटर रसायण, 3 दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला होता. गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी पुणे पोलिस आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Video: पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस

पुणे: 'मुळशी पॅटर्न'मधील पिट्या भाईंनी युवतींचा धक्कादायक Video आणला समोर…

पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…

Video: पुणे शहरात एम.डी. ड्रग्ज रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक…

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे पोलिसांची ड्रग्जनंतर दारूवर मोठी कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka