Dailyhunt
पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार.

पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार.

पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे.

अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला होता. “पोलिसांना फोन का केला?” याच रागातून आरोपी शफाक शेख आणि त्याच्या साथीदारांनी अस्लम खान यांना लोखंडी फायटरने बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या अस्लम खान यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ सलीम आणि पुतण्या अब्दुल समद तेथे आले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग करत थेट ससूनच्या गेटवरच हल्ला चढवला. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात अस्लम, सलीम आणि अब्दुल हे तिघेही गंभीर जखमी झाले. भरवस्तीत आणि रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन्ही गटांच्या १८ ते २० जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शफाक शेख, शहबाज खान आणि दुसऱ्या गटातील मोहम्मद जिब्रान सय्यद यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…

पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka