Dailyhunt
पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; 'सदैव एकनिष्ठ' स्टेटस ठेवणारा गजाआड.

पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; 'सदैव एकनिष्ठ' स्टेटस ठेवणारा गजाआड.

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख याला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे.

दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील युवतीच्या कुटुंबाकडून केला जात होता आणि याला अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेख याच्या अटकेची मागणी केली जात होती. अझर शेख यासोबत युवराज मेंगावडे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणात अझर शेख याने स्वामी चिंचोली गावाच्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

भिगवणमधील युवतीचे कथित अपहरण प्रकरण चर्चेत आले त्या प्रकरणातील युवक आणि युवती ज्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्याच्या काही तास आधी अझर शेख याने सोशल मीडियावर ‘सदैव एकनिष्ठ’ असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे भिगवण प्रकरणात तरुण-तरुणीला पळवून लावण्यात त्याचाच हात असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच त्याच्यावर दौंड परिसरातील विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अझर शेखला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

दरम्यान, भिगवण अपहरणात प्रकरणातील युवतीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या युवतीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

युवतीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी अझर शेख याला घेतलं ताब्यात…

पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…

भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…

भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…

भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka