Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा.

पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा.

पुणे: श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना पोलिसांना धडा शिकवला आहे. चोरट्यांना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्रे आणि महागडे मोबाईल लंपास करण्याचा सपाटा लावला होता.

याविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८९ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तब्बल ११ घटनांची नोंद करण्यात आली आहे. या ११ पैकी तब्बल ९ घटना एकट्या हडपसर परिसरात घडल्या आहेत. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उठवून वारकऱ्यांचे मोबाईल आणि दागिने पळवले. या प्रकरणी हडपसरसह समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, वानवडी आणि खडकी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यातील ही चोरी आणि सोनसाखळी हिसकावण्याचे सत्र रोखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार विशेष पथके तैनात करून एक मोठी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये ६७ महिला आणि २२ पुरुषांचा समावेश असून, पोलिस सध्या या सर्वांची कसून चौकशी करत आहेत. वारीच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी महिला चोरांची मोठी टोळीच सक्रिय असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.

वानवडी परिसरातील शंकरमठ-रामनाथ मळा येथे पालखी दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या पँटच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल चोरला. मात्र, यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी प्रचंड प्रसंगावधान राखले. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने धावपळ करत दोन संशयितांना रंगेहात पकडले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या चोरांकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला आहे. वारीत येणाऱ्या भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…

पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…

पुण्याचा 'धडाकेबाज गन मॅन' निर्दोष; खोट्या तक्रारींचे षड्यंत्र अखेर उधळले…

पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka