पुणे: पुणे शहरातील कात्रजमध्ये एका अल्पवयीन मुलाची जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनीच निर्घृणपणे हत्या करण्यात केली. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीवर बांधून धिंड काढली.
संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमध्ये गणेश रविंद्र माळवे (वय १७) या मुलाची कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली होती. गणेश माळवे हा मोबाईल दुरुस्ती करण्यासाठी गेला होता. त्यावेळी जुन्या वादातून ७ जणांनी सोमवारी रात्री त्याच्यावर हल्ला केला. या टोळक्याने कोयत्याने गणेशवर सपासप वार केल्यानंतर डोक्यामध्ये दगड घालून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून गणेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. जुन्या वादातून 7 जणांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. हत्या करणारे सर्व आरोपी अल्पवयीन आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांकडून 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांची भरपावसात गाडीला बांधून धिंड काढली. ज्या परिसरामध्ये गणेशची हत्या करण्यात आली होती, त्याच परिसरामध्ये या अल्पवयीन पोरांची गाडीवर बांधून धिंड काढली. यावळी आरोपींना दाखवण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर मागणी केली. नातेवाईकांनी यावेळी गोंधळ घालत आरोपींविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणी सात जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…

