Dailyhunt
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक.

पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बालहक्क न्यायालयाकडून सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जर त्याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार आहे, अशी पुणे पोलिसांनी दिली आहे.

पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस पाठवण्यात आली आहे. जर न्यायालयात अल्पवयीन आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.

'कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. याच ऑर्डरविरोधात पुणे पोलिस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा ज्युवेनाईल बोर्डालाच रिव्ह्यू घ्यायला सांगितले. पुणे पोलिस या केसमध्ये शेवटपर्यंत लढत राहतील. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा आदेश येईल, त्यानंतर कारवाईची दिशा ठरवू.' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

‘अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी कारवाईकरून ताब्यात घेतले आहे, कारण अल्पवयीन मुलांना बिना नंबरची गाडी चालवायला देणे हादेखील गुन्हा आहे. या पुढे ड्रंकन ड्राईव्हविरोधात मोठी मोहिम हाती घेणार आहे', असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

The post पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka