पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातात युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यात अपघात विषयावर निबंध लिहिणं, ट्राफिट कंट्रोलरसोबत १५ दिवस वाहतूक नियोजन करण्या याचा समावेश होता. अल्पवयीन वाहनचालक असल्याचे गुन्हेही सातत्याने समोर येत असतात. त्याबाबतही सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार वाहनचालक अल्पवयीन असल्यास त्याला 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसेच त्याला 25 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही. अल्पवयीनाला वाहन देणाऱ्या वाहनमालकाची नोंदणी रद्द होणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. सरकारी सेवेतून जुनी वाहने रद्द केली जाणार आहेत. तर अल्पवयीन चालकावरही कठोर कारवाई केली जाईल. ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
धनिकपुत्र पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना चिरडले. अल्पवयीन मुलाने जी पॉर्श गाडी चालवली ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती. टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती, तरीही गाडी रस्त्यावर फिरत होती.
The post पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

