Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया.

पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया.

पुणे: पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी रात्री उशिरा छापेमारी केली. यावेळी तिथे रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, मद्य आणि हुक्काचे सेवन केल्याचे पोलिस छापेमारीत समोर आले आहे. हा सगळा प्रकार खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू होता. हाउस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिलांसह 7 जणांचा समावेश होता. अटक केलेल्या आरोपींची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

खराडी परिसरातील ज्या रुममध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती, ती रुमदेखील खेवलकर यांच्याच नावावर बूक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या छापेमारीचा देखील व्हिडीओ समोर आला आहेत. ज्यावेळी पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकला. तेव्हा या पार्टीत एकनाथ खडसे यांच्या जावयासह इतर चार पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या. सर्वजण हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी करत होते.

एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'मला या प्रकरणाबद्दलची जास्त माहिती नाही. सध्याच्या वातावरणामुळे असे काही घडेल, असे मला वाटतंच होते. मी केल्या आरोपांमुळे अडकवलं जातंय, याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य बाहेर आलंच पाहिजे, मग तो जावई असो वा कुणी असो. पण त्याची सत्यता समोर आल्याशिवाय समजणार नाही. मी स्पष्ट मताचा माणूस आहे. मी कुणाला वाचणारा माणूस नाही.'

The post पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka