पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिस उपनिरीक्षक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
दत्तात्रय कुरळे हे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
The post पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

