Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार.

पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार.

पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत..

कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटात क्रिकेटची मॅच मंगळवारी पार पडली. या गटात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाले आणि हा वाद मिटवण्यासाठी या दोन्ही गटातील युवक बुधवारी भेटले. यावेळी एका गटात एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. वाद मिटवण्यासाठी आलेल्या युवकांममध्ये पुन्हा वाद झाले. यावेळी गटातील एकाने समोरच्या गटात असणाऱ्या युवकावर बंदूक ताणली आणि गोळी चालवली. मात्र ती गोळी त्याला लागली नाही. गोळीबार होताच परिसरात पळापळ झाली. यावेळी 2 युवक जखमी झाले आहेत.

दरम्यान, गोळीबार झाल्याची घटना समजताच परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

The post पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka