Dailyhunt
पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार.

पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार.

पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी, बुधवारी सकाळी आणि पुन्हा मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरले. सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात बुधवारी (ता.

१७) मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे शहरातील सिंहगड रोडवर बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली आहे. क्षुल्लक कारणातून हा गोळीबार झाल्याची माहिती पुढे आली आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांची परेड घेत तंबी दिली होती. जंगली महाराज रोडवर मंगळवारी गोळीबाराचा झालेला प्रयत्न आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण यानंतर गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे चर्चेत आले आहे.

The post पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka