Dailyhunt
पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की.

पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की.

पुणे : पोलिस नसतानाही चारचाकी वाहनावर पोलिस असल्याची नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली.

त्यानंतर मात्र या पोलिस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पळून गेला असून, गेल्या 24 तासापासून या बिबट्याचा शोध सुरू आहे. संग्रहालयाचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे जवान या बिबट्याचा शोध घेत आहेत. याच दरम्यान एक चारचाकी वाहन प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर आले. त्याच्यावर पोलिस असे लिहिले होते. मोटारीच्या चालकाने आपण पोलिस असून आतमध्ये जाऊ द्या असे सांगितले. दरम्यान प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याला त्याचा संशय आला. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याचे बिंग फुटले. तरीही त्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी केली. इतकच नाही तर धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र संतापलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी त्याला ताब्यात घेतले आहे. हा संपूर्ण प्रकार सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.

दरम्यान, राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज परिसरात आहे. हा बिबट्या पळाल्याने या परिसरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दीदेखील केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

The post पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka