Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या.

पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या.

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका रिअल इस्टेट एजंटाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मयूर सुनील नरे (वय ३१, रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिविनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप म्हणून मयूर नरे यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते काही बांधकाम प्रकल्पाची कामे करत होते, तसेच इस्टेट एजंट म्हणूनही काम करायचे. शनिवारी (ता. ९) ते कार्यालयात गेले, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या भावाने रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहिले असता मयूर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

दरम्यान, मयूर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे-घेणे त्यांनी लिहून ठेवले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

The post पुणे शहरात व्यावसायिकाची गोळ्या झाडून आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka