Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क.

पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे स्केजही जारी केले आहे. या व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, पोलिसांना याची माहिती पहाटे 5 वाजता समजली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची श्वानपथकाकडून पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी 10 पथकं तयार केली आहेत. पीडित मुलीच्या मित्राला मारहाण करत नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या युवक आणि युवतीला आरोपींनी गाठले होते. युवकाला बांधून ठेऊन मुलीवर तिघा जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगावचा आहे. हे दोघेही पुण्यातील एका हॉटेल मॅनेजमेंट शिकवणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

घटना घडली ती जागा एकांत ठिकाणी असल्याने आणि नेटवर्क नसल्याने कोणतीही मदत पीडित मुलीस मिळू शकली नाही. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असलेले पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली, त्यानंतर आज (शुक्रवार) सकाळी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिवाय, आरोपींचे स्केज जारी कले आहे. आरोपींचा मागोवा नसल्याने प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून स्केचेस बनवून तपास केला जात आहे.

कोंढवा पोलिस स्टेशन गु रजि नंबर 1122/2024 या गुन्ह्यातील संशयित आरोपींचे स्केच असून त्यांचे बाबत काही माहिती मिळाल्यास खालील नंबर वर त्वरित संपर्क साधावा.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन श्री विनय पाटणकर मो नं 8691999689
पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री. युवराज हांडे मो नं. 8275200947 /9307545045
नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880

पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…

पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…

पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…

पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka