Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा.

पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा.

पुणे : डेटिंग साइटवर ओळख झालेल्या महिलेने एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 20 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यामुळे ज्येष्ठ नागिरकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

फसवणूकीचा हा प्रकार 9 जानेवारी 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत त्रिमुर्ती कोर्ट कोरेगाव पार्क येथे घडला आहे. याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नेहा शर्मा हिच्यासोबत एका डेटिंग साइटवर ओळख झाली होती. पुढे दोघे एकमेकांसोबत बोलू लागले होते. एकदा नेहा हिने फिर्यादींना गुंतवणुकीबद्दल माहिती देऊन कॅपिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी सुरुवातीला 50 हजार गुंतवले. त्याचा नफा दिसून येत होता म्हणून नेहाने वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडून फिर्यादी कडून एकूण 20 लाख 53 हजार रुपये उकळले.

फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काढता येत नव्हते म्हणून नेहा हिला विचारणा केली. त्यावेळी तिने आणखी पैसे भरण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आयटी अॅक्ट सह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka