Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील 'रुबी हॉल'मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड.

पुणे शहरातील 'रुबी हॉल'मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड.

पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर डॉ. श्‍याम व्होरा यांनी वसतीगृहात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. व्होरा (मूळ रा. गुजरात) यांनी वसतीगृहाचा बराच वेळ दरवाजा उघडला नाही म्हणून सुरक्षा रक्षकाने दरवाजा तोडला. तेव्हा व्होरा हे गळफास घेतलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाला दिसले. रुममध्ये एक चिठ्ठी आढळली असून त्यांनी त्यात मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. यामुळे पोलिसांनी मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. तपासाअंती त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकेल. डॉ. व्होरा यांच्यावर कामाचा तणाव होता की इतर काही हे अद्यापही समजू शकले नाही. डॉ.व्होरा यांच्या आत्महत्येने त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. डॉ. व्होरा यांचा स्वभाव हसत खेळत होता. यामुळे सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकच्यावतीने कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांनी खुलासा केला आहे की, आमच्या निवासी डॉक्टरांपैकी एक, डॉ. श्याम व्होरा यांनी त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली. ही दुदैवी बातमी सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेले अंदाज पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहेत. पोलिस अधिकारी त्यांची चौकशी पूर्ण करेपर्यंत निष्कर्ष काढण्यापासून किंवा अंदाव वर्तवण्यात येऊ नयेत अशी आम्ही विनंती करतो.

किडनी रॅकेट प्रकरणामुळे सन २०२२ मध्ये रुबी हॉल क्लिनिक चांगलेच चर्चेत आले होते. काही वरिष्ठ डॉक्टरांसह तेव्हा ९ जणांविरुध्द कोरेगाव पार्क पोलिस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ससूनचे तात्कालिन अधिक्षक डॉ. अजय तावरे यांचा मुख्य हात असल्याचे पुढे आले आहे.

Video: डॉ. अजय तावरे हाच किडनी रॅकेटचा सूत्रधार…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा…

डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…

मोठी बातमी! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटबाबत घेतला मोठा निर्णय…

The post पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka