पुणे: पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, रेकॉर्डवरील गुन्हेगार भक्तीसिंग दुधानी हा चांभार गल्ली डायसप्लॉट येथे त्याचे कमरेस पिस्टल लावून फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी आम्हांस सदर बातमीबाबत माहिती दिली असता आम्ही वर नमुद तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले.
पोलिसांचे पथक 23/55 वा सुमारास सदर ठिकाणी गेला असता ते ओळखत असलेला स्वारगेट पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार भक्तीसिंग दिपकसिंग दुधानी हा त्यांना दिसून आला. सदर स्टाफ त्याचे दिशेने जाताच, तो सदर ठिकाणाहुन चांभार गल्लीमध्ये पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व पॅन्टचे उजव्या खिशामध्ये 02 जिवंत काडतुसे असा एकुण 21,00/- रुपये किंमतीचा माल मिळून आल्याने त्याचे विरुध्द स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं. 103/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) सह 135, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 07 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस दाखल गुन्ह्रात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, सह-आयुक्त, पुणे शहर, प्रविण कुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- 2 पुणे शहर, राहुल आवारे, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलिस हवालदार 2684 मोराळे, पोलिस हवालदार 7899 शिंदे, पो/अं 10057 पवार, पो/अं 9963 खेंदाड, पो/अं 10062 शेख, पो/अं 10068 चव्हाण, पो/अं 2190 दुधे, पो/अं 10147 घुले, पो/अं 8237 टोणपे, यांनी एकत्र मिळून केली आहे.