पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आज (सोमवार) पहाटे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आले. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जाताच एका हॉटेलसमोर दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चार चाकी गाडीत बसवले आणि अपहरण करून घेऊन गेले. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर तपास अधिकारी व पथक तपास करीत आहेत. तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक
The post पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

