Dailyhunt
पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण.

पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण.

पुणे: पुणे शहरात रात्रीच्या सुमारास एक युवक एका युवतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका किरकोळ वादातून एका युवकाने युवतीच्या कानशिलात लावत लाथा बुक्क्यांनी मारल्याचे हा व्हिडीओमध्ये दिसत आहे.

परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. परंतु, मारहाण कुठल्या कारणामुळे झाली याबाबतती माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुठली ही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस यांनी दिली.

दरम्यान, पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पोलिसांनीही आरोपींविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे.

The post पुणे! युवतीला रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka