Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं.

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं.

पुणे: कुख्यात गुंड घायवळ टोळीने बुधवारी (ता. १७) अवघ्या १५ मिनिटांत दोन कांड केले आहे. हल्लेखोरांनी आधी एका व्यक्तीवर गोळीबार केला. यानंतर अवघ्या १५ मिनिटांत आणखी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले आहेत.

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घायवळ टोळीतील पाच गुंडांना अटक केली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते 'पुणे गणपती' पुस्तकाचे प्रकाशन!

मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड आणि गणेश राऊत असे अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. या चार जणांसोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी घायवळ टोळीचे सदस्य आहेत. या पाचही जणांनी बुधवारी मध्यरात्री पुण्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत त्यांनी हे गुन्हेगारी कृत्य केल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, ‘कोथरुड परिसरात मुठेश्वर परिसर आहे. या परिसरात बुधवारी रात्री साडेअकरा वाजता प्रकाश धुमाळ आले होते. ते आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी खेड शिवापूरला गेले होते. पार्टीनंतर धुमाळ त्यांचा एक साथीदार मुठेश्वर भागात राहत होता. त्यामुळे त्याला ड्रॉप करायला गेले होते. ते ड्रॉप करत असताना तिथे पाचही संशयित आरोपी आले. आरोपींनी आम्हीच याठिकाणचे भाई आहोत. तुम्ही इथं का थांबलात, असं म्हणत दहशत माजवली आणि प्रकाशच्या मांडीवर गोळी झाडली. यात ते जखमी झाले. जखमीला तत्काळ पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. या गोळीबारानंतर याच आरोपीनीं घटनास्थळावरून काही अंतरावर असणाऱ्या एका कॉलनीजवळ सागर साठे नावाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार केले. दोन्ही घटनांमध्ये ३०७ आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.’

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

The post पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka