Dailyhunt
राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन.

राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन.

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखं बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली होती.

न्याय जोडो यात्रेदरम्यान हा हल्ला करणार असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले.

संबंधित फोनकॉलनंतर सुरक्षा यंत्रणादेखील अलर्ट झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांच्या निवासस्थान परिसरात पोलिस सुरक्षा वाढवली. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिस, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांना राहुल गांधी यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश देण्यात दिले आहेत. राहुल गांधी यांना सध्या झेड प्लस सुविधा आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याचा कट असल्याची माहिती नाशिक पोलिसांना एका फोनद्वारे मिळाली होती. या फोननंतर नाशिक पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांना ही माहिती देत या प्रकरणाचा तपास केला. या पोलिस तपासात फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, असे असले तरी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सगळ्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसची भारत न्याय जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे. 12 मार्च रोजी गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!

The post राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka