छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. ऑनर किलिंगच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अमित याने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमित वर 14 जुलै रोजी चाकू तलवारीने हल्ला केला. उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाई आक्रमक झाले आहेत. फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post ‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

