Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्.

साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्.

हैद्राबाद (तेलंगणा): आई-वडील आणि नातेवाइकांना खूश करण्यासाठी रेल्वेत बनावट पोलिस उपनिरीक्षक बनून फिरणाऱ्या २५ वर्षीय महिलेला तेलंगणा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिने अनेक ठिकाणी फसवणूक केल्याचा आरोप असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी महिलेचे नाव जदाला मालविका असे आहे. महिलेने आपली बनावट ओळख सांगून तेलुगू चित्रपट अभिनेत्यांसोबत ओळख वाढविली. त्याचा अनेकदा तिने फायदाही घेतला. ती प्रवशांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून ओळख करून देत असे. यातून अनेकांना गंडा घातल्यानंतर तिच्याविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या, मालविका आपल्या साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आल्यानंतर तिच्या होणाऱ्या पतीमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

दरम्यान, पोलिसांनी जदाला मालविका हिला ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईकांना मोठा धक्का बसला. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

The post साखरपुडा सोहळ्यात खाकी गणवेश परिधान करून आली अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka