मुंबई : सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाने गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
विक्की साहब गुप्ता (वय 24) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय 21) अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपी गोळीबारापूर्वी पनवेलमध्ये ज्या घरात थांबले होते, त्या घराच्या मालकाला आणि गुन्ह्यासाठी ज्याची दुचाकी वापरण्यात आली त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर गोळीबार करण्यापूर्वी हे आरोपी पनवेलमध्ये एका घरात 22 दिवस थांबले होते. या घराच्या मालकाला तसेच आरोपींनी गुन्ह्यासाठी ज्या दुचाकीचा वापर केला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमानच्या घरासमोर फायरिंग केल्यानंतर आरोपींनी गुजरातच्या कच्छला पलायन केले होते. पोलिस त्यांना शोधण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारला जातील, म्हणून ते कच्छला गेले. तिथे ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहिले. मात्र तात्रिंक बाबींचा अभ्यास करून अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही हजार रुपयांसाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली या दोघांनी चौकशीत दिली. गोळीबार करण्याआधी दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी मध्यरात्री देखील सलमान खानच्या घराची रेकी केली होती. सलमान खानच्या घराबाहेर रात्री उशीरापर्यंत चाहत्यांची गर्दी असल्याने पहाटे गोळीबार करण्याचा कट त्यांनी आखला होता. त्यानुसार त्यांनी हा गोळीबार केला. गोळीबारानंतर दोघेही गुजरातला पळून गेले होते. मात्र, अखेर मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे. दुचाकीवरून आलेल्या या दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांचा चेहरा झाकलेला होता. पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली आहे. गोळीबारानंतर शूटर अभिनेत्याच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर माउंट मेरी चर्चजवळ बाईक सोडून गेले होते.
सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

