वर्धा: समृद्धी महामार्गावरील वर्ध्याच्या विरुळ जवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. दुसऱ्या वाहनातील एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने हि भीषण अपघाताची घटना घडली. धडकेनंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी कार तोडावी लागली. कारमधील चारही जण वर्धा जिल्ह्यातील सालोड गावचे रहिवासी होते. मृतांमध्ये दोन जुळ्या बहिणींचा समावेश होता, ज्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या, परंतु परत येताना या भीषण अपघाताला बळी पडल्या.
इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झालेला असल्याने दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असताना हा अपघात घडला असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळतच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जखमींना रुग्णालायात दाखल केले.
वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर घडला. इथेनॉल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा आधीच अपघात झाला होता आणि तो महामार्गावर उभा होता, त्यामुळे प्रशासनाला वाहतूक वळवावी लागली. त्याचवेळी, पुण्याहून वर्ध्याकडे जाणारी एक कार भरधाव वेगाने त्या ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांना तात्काळ आग लागली. ट्रकचालक आणि क्लिनर यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, तर कारमधील चार प्रवासी आत अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं…

