Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.

त्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील हर्सूल सावंगी गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल सावंगी या ठिकाणी नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 जवळ अपघात झाला होता. अपघातात तीन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला होता. जखमींना छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

रितेश भाणादकर , संदीप साखरवाडे, स्वरूप रामटेके आणि आशिष सरवदे हे चौघेजण कारमधून मुंबई कडून नागपूरच्या दिशेने जात असताना कारचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. चौघे जखमी भंडारा येथील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka