सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप २५ वार केले आहेत.
विपूल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या मोबाईल दुकानदाराचे नाव आहे. सांगली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर 'भैरवनाथ' मोबाईल शॉपी आहे. याच ठिकाणी त्याचा खून झाला आहे. काही युवका गोस्वामी याच्या दुकानावर मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी विपुलने मोबाईल स्क्रीन गार्डची किंमत शंभर रुपये असल्याचे सांगितले. पण मोबाइल स्क्रीन गार्ड केवळ पन्नास रुपयांना मिळतं, असे सांगत स्क्रीनगार्ड खरेदी करायला आलेल्या युवकांनी गोस्वामीसोबत वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, वाद इतका विकोपाला गेला की दुकानावर आलेल्या चार युवकांनी थेट विपुलवर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले. या हल्ल्यात विपुलचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना विपूलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…
हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…
सांगलीत सिनेस्टाईल पद्धतीने नंग्या तलवारी नाचवल्या; युवकाची हत्या…
सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…
सांगली हादरली! एकाच कॉलेजमधील येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीची आत्महत्या…
The post सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

