Dailyhunt
सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं.

सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं.

सांगली : इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघांनी एका रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

रोहित पंडित पवार असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.

रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता. त्यातून हल्लेखोर हे रोहित पंडीत पवार याच्या मागावर होते. रोहित पवार हा शुक्रवारी (ता. 1) कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले. रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार केले. डोक्यात वार केल्यावर ते हत्यार रोहितच्या डोक्यातच रुतून बसले होते. त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिसात हजर झाले आहेत. त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. पोलिसांच्या चौकशीतून एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. रोहित पंडित पवार (वय 23, रा. बेघर वसाहत, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. ओमकार राजेंद्र गुरव (इस्लामपूर) याने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हौसेराव कुमार आंबी (वय 21, रा. हुबालवाडी, ता. वाळवा) आणि दोन अल्पवयीन विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृत रोहित हा अट्टल गुंडप्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. पैशाच्या कारणातून तो अनेकांना त्रास देत होता. हल्लेखोरांना तो नेहमीच खुन्नस देत होता. त्यामुळे त्यांच्यात धुसफूस सुरू होती. त्यातून हल्लेखोर हे रोहितच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी तो कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठले. त्याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार करून त्यांनी पलायन केले. अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

The post सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka