Dailyhunt
संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली.

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली.

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा घटस्फोटीत पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो सामना खेळत असताना संजय कपूर यांनी मधमाशी गिळली आणि पुढे काही सेकंदातच त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.

मृत्यूच्या आठ दिवसांनी संजय कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी करिश्मा कपूर आपल्या मुलांसह संजय कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती. घटस्फोटीत पतीच्या निधनानंतर करिश्मा कपूरनं पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा 25 जून रोजी तिचा 51वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिच्या सर्व चाहत्यांनी तिला वाढदिवलाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर करिश्माने सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांचे आभार मानले आहेत. शिवाय, घटस्फोटीत पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिलेलं की, "तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार…" यासोबतच तिनं रेड हार्ट इमोजी आणि हात जोडलेला इमोजीदेखील पोस्ट केला आहे. तिनं तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ही पोस्ट शेअर केली आहे.

इंग्लंडमध्ये संजय कपूर यांचे निधन झाल्यानंतर, 19 जून रोजी दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर, संजय कपूर यांच्यासाठी दोनदा प्रार्थना सभा घेण्यात आल्या. करिश्मा कपूर तिचा घटस्फोटीत पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी आणि दोन्ही प्रार्थना सभांसाठी तिच्या मुलांसह दिल्लीत पोहोचली होती.

दरम्यान, करिश्मा कपूर हिने उद्योगपती संजय कपूर यांच्याशी 2003 मध्ये आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पुढे 2016 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. यावेळी दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. करिश्मासोबतचं लग्न हे संजय कपूर यांचे दुसरं लग्न होते. यापूर्वी त्यांनी नंदिता महतानीसोबत पहिले लग्न केलं होतं. करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केले.

संजय कपूर यांचे निधन; करिष्माच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण…

करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…

अभिनेता तुषार घाडीगावकार याने काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

The post संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka