Dailyhunt
संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले.

संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले.

रण (नवी मुंबई): आईच्या कुशीत झोपलेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला नराधम बापाने हिसकावून घेत जमिनीवर जोरात आपटून मारल्याची संतापजनक घटना उरणमधील बोकडविरा येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

अमुता खुशीराम ठाकूर ही पती खुशीराम गजानन ठाकूर याच्या सोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत राहत आहे. दोघांना पाच महिन्यांपूर्वी मुलगी झाली होती. तिचे नाव रुही असे ठेवण्यात आले होते. अमुता आणि खुशीराम यांच्यात रविवारी दुपारी काही कारणावरून भांडण झाले. तेव्हा अमुता तिच्या पाच महिन्यांच्या रुहीला घेऊन शेजारी नातेवाईकांकडे गेली.

पत्नी आपल्या चिमुकल्या मुलीसोबत नातेवाईकांकडे गेल्यानंतर संतापलेल्या खुशीराम ठाकूर याने नातेवाईकाचे घर गाठले. तिथे त्याने माझी मुलगी दे असे म्हणत पत्नी अमुता हिच्याशी वाद घातला. आपल्या चिमुकलीला देण्यास आईने विरोध केला. तेव्हा खुशीरामने रुहीला हिसकावून घेतले आणि जोरात जमिनीवर आपटले. पाच महिन्यांच्या रुहीला जमिनीवर आपटल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच ती मृत्यूमुखी पडली.

नराधम बापाने चिमुकलीचा बळी घेतल्याने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची माहिती उरण पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी खुशीराम गजानन ठाकूर याला अटक करण्यात आली आहे.

The post संतापजनक! बापाने चिमुकलीला जमीनीवर जोरात आपटून मारले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka