Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार.

संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार.

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे चार वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजय ताठोड (वय 24) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

राजगुरुनगर शहरात वास्तव्यास असणारा चार वर्षांचा चिमुकला घराजवळ खेळत होता. आरोपीने त्याला खाऊचे आमिष दाखवून घरात घेऊन गेल्यावर चिमुकल्या मुलावर अमानुषपणे अनैसर्गिक केला. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात नराधम विजय ताठोड याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka