गोंदिया : एका शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवून लज्जास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. त्याने तिच्या घरी जाऊन तिला अश्लील व्हिडील क्लिप दाखवल्या तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या मुलीच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ’22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या घरी गेली, त्यानंतर तिच्या शाळेतील शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम (वय 50) हा तिच्या घरी आला. त्याने या मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत अश्लील व्हिडीओ क्लिप दाखवली, मुलीने व्हिडीओ क्लिप पाहाण्यास नकार देताच त्याने पीडितेचे केस धरून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ दरम्यान, या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाविद्यालयातील मुलींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा; 300 व्हिडिओ…
Video: नाशिकमध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना महिलेने शिकवला चांगलाच धडा…
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…
शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…
The post संतापजनक! शिक्षकानं आधी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

