Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे.

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठित करण्यात आली.

या एसआयटी समितीमध्ये 10 जणांचा समावेश आहे. पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्त्व देण्यात आले आहे.

एसआयटी पथकात बीड सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपमहानिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत काळकुट्टे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलिस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला 24 दिवस उलटल्यानंतरही अद्याप तीन मारेकरी फरार आहेत. वाल्मिक कराड याने 22 दिवसांनी स्वत:हून शरणागती पत्कारली होती. त्यामुळे पोलिस आणि सीआयडीच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सध्या वाल्मिक कराड पोलिस कोठडीत असून त्याला बीड शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी सध्या वाल्मिक कराड याची कसून चौकशी करत आहेत. वाल्मीक कराड याच्यावर सध्या फक्त पवनचक्की निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिस कोठडीतील चौकशीनंतर वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एसआयटीमधील समावेश…
– आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलिस उपमहानिरीक्षक
– अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
– विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
– महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
– आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
– तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
– मनोज राजेंद्र वाघ – पोलिस हवालदार
– चंद्रकांत एस.काळकुटे – पोलिस नाईक
– बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलिस नाईक
– संतोष भगवानराव गित्ते – पोलिस शिपाई

The post संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka