Dailyhunt
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ.

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ.

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला आज (बुधवार) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला.

केज तालुक्यात संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती. 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती असल्याचेही अनिल गुजर यांनी सांगितले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे.

वाल्मिक कराड याच्यावर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. MCOCA कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. वाल्मिक कराड याने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीने केला आहे. दरम्यान, वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. वाल्मिक कराड वर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला आहे.

The post संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka