Dailyhunt
सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात.

सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात.

नाशिक : सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.15 बी.एन.0555) खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील दोन महिला तीन पुरुष भाविक होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सप्तशृंगी गडावरुन इनोव्हा कार दरीत कोसळली. गणपती पॉइंटजवळ संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळली आहे. दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. 1000 फूट खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत.

अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आली आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती आहे. या घटनेनंनतर बचावकार्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही लोकं हे रस्त्यावरुन उभे राहून दरीच्या दिशेला पाहताना दिसत आहेत. खोल दरीत जिथे कार कोसळली आहे तिथे पाच-सहा जण पोहोचलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अडकलेली गाडी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतील अपघाग्रस्तांना जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कारदेखील बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, अपघात नेमका कसा घडला? त्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. गाडीचा ब्रेक फेल झाला की भरधाव वेगामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटले की तीव्र वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka