Dailyhunt
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या.

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या.

बीड: मस्साजोग (ता. केज) गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून जानेगाव (ता. केज) येथील युवकाने आत्महत्या केली आहे.

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने अशोक हरिभाऊ शिंदे (वय २३, रा. जानेगाव) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील व्हायरल झालेले फोटो पाहून अशोक शिंदे हा अस्वस्थ झाला होता. या विषयावर गावातील मित्रांसमवेत चर्चा केली. घरी जाऊन येतो असे सांगून घरात गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष भैय्यांच्या आठवणीत काल (ता. 4) जानेगाव बंद ठेवण्यात आले होत. यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता. मात्र ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्या टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केले आहे.

The post सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka