Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण.

सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण.

बंगळुरु : कर्नाटकातील बिदरमध्ये सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घडला आहे. मृत महिलेच्या आई वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहेत.

अंजनबाई शेखर पाटील (वय २५) हिने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनबाईचे वडील विजय कुमार यांनी तिचा नवरा शेखर पाटील, सासू अरुणाबाई आणि सासरे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

विजय कुमार यांनी सांगितले की, मुलगी अंजनबाई हिचा विवाह २०२२ मध्ये बिदर येथील शेखर पाटील याच्याशी झाला. शेखर पाणीपुरी विकण्याचं काम करायचा. तो रात्री उशिरा घरी यायचा. अंजनबाई त्याला काम संपल्यानंतर लवकर घरी ये म्हणून सांगत होती. यावरून दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. त्यानंतर सासू-सासऱ्यांशीही तिचे खटके उडू लागले. अंजनला चांगलं जेवण बनवता येत नाही, ती चांगली नाही, असे तिचे सासू-सासरे तिला म्हणत होते.

‘माझ्या मुलीने मला सांगितले होतं, की तिची सासू अरुणबाई हिचे अनैतिक संबंध आहेत. सासू माझ्या मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास दबाव टाकत होती. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात सासरच्या मंडळींवर संशय आहे’ असे विजय कुमार यांनी म्हटले आहे. माझ्या मुलीने आत्महत्या केली कारण ती आता तिचा पती आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला, तसेच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी केलेला दबाव सहन करू शकत नव्हती. पोलिसांनी आता तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

अनैतिक संबंध! पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलवले अन्…

पुणे शहरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंध…

नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

अनैतिक संबंध! प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीला रिक्षात बसवलं अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka