सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूथ येथे माहेरी आलेल्या एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत शनिवारी (ता. २७) उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संचिता साळुंखे (वय 22) ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे. महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याचे समजताच खळबळ उडाली. कृष्णेच्या पात्रात सध्या शोधमोहीम चालू आहे. दोन वर्षीय मुलीचा मृतदेह मिळाला आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे. महिलेने कशामुळे पाण्यात उडी घेतली, हे समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चिमुकलीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांवर पोहोचली आहे. पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अडचणी येत आहेत.
The post सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

