Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली.

सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली.

सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते.

कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणला असून, मृताची पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले सलग दोन दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्री ठाण्याहून कराडला येत होते. शनिवारी (ता. ६) सकाळी साडे पाचच्या दरम्यान कोल्हापूर नाक्यावर उतरून चालत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अल्टो कारने यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर त्यांना उडविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी मंडले गंभीर जखमी अवस्थेत पडले होते.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने ते आपले पती लक्ष्मण श्रीरंग मंडले असून ठाण्याहून कराडला आले होते. त्यांना घेण्यासाठी मी आले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जखमी अधिकाऱ्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाचा संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता धक्कादायक प्रकार समोर आला.

लक्ष्मण मंडले हे चालत निघाले असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यांची बॅग आणि अन्य साहित्य घेऊन दोघेजण पळून गेले. काही वेळात परत येऊन पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. पोलिस अंमलदार नवनाथ व्हनमाने यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गतीने तपास सुरू केला.

मृत लक्ष्मण श्रीरंग मंडले (जलसंधारण अभियंता, शहापूर, जि. ठाणे, मूळ रा. मनव, ता. कराड) यांनी आपण बसने कराडला येत आहोत. मला पहाटे कोल्हापूर नाक्यावर घ्यायला ये, असे पत्नी सुरेखाला फोन करुन सांगितले होते. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते, अशी माहिती तपासात समोर आली. पती त्रास देत असल्याच्या रागातून एक महिन्यापूर्वी सुरेखा मंडले व तिचा सख्खा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण या दोघांनी काटा काढायचे ठरवले होते. त्यासाठी ओळखीच्या दोघांना सुपारी दिली. त्यांना पतीचे लोकेशन कळवून पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तपासात निष्पन्न झाली. याप्रकरणी मृताची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय 36, रा. मनव, ता. कराड), मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय 40, रा. सुरुल, ता. वाळवा, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करून पळून गेलेल्या दोघांच्या शोधार्थ तीन पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…

सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…

सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka