Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का.

सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का.

सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सचिन लावंड (रा. दरूज, ता. खटाव) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सचिन लावंड यांना काविळ झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

सचिन लावंड यांनी निधनापूर्वीच स्वतःच्या फोटोसह व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘सावडणे विधी ४/१२/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता आहे’ असे लिहिले होते. हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर सहकाऱ्यांनी चौकशी केली असता लावंड यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचे समजले.

सचिन लावंड हे सातारा पोलीस मुख्यालयातून काही दिवसांपूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. नवीन ठिकाणी रुजू होऊन अवघ्या चार दिवसांतच ते आजारपणाच्या रजेवर गेले होते. रजेवर असतानाच त्यांना काविळ झाल्याचे निदान झाले. काविळ संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सचिन लावंड यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवलेले स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरला. त्यांनी स्वतःच्या फोटोसह ‘दि. ४ रोजी सकाळी ८ वाजता, दरुज येथे सावडण्याचा विधी आहे,’ असे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी केली आणि त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमीची खात्री केली. सचिन लावंड यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. लावंड यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Loading…

The post सातारा! पोलिसाच्या मृत्यूपूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने सगळ्यांनाच धक्का… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka