Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे.

सेवानिवृत्त शिक्षकाने अनैतिक संबधाच्या संशयावरून पत्नीचे केले ५७ तुकडे.

पाटणा (बिहार) : एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दोघांच्या लग्नाला 57 वर्षे झाली होती. पत्नीच्या हत्येनंतर 57 तुकडे केल्याची धक्कादायक घटना अरवाल जिल्ह्यात जमुहरी गावात घडली आहे.

सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद (वय ७६) याची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खासगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून धक्का बसला. बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकऱ्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केले आहे.

पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार भील यांनी सांगितले की, ‘सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याने पत्नीचे 57 तुकडे केल्याचा दावा केला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.’ आरोपी बिरबल प्रसादने सांगितले की, लग्नाला 57 वर्षे झाली होती, त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण 57 तुकडे केले. पत्नी सुमतीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर हत्या केली.’ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka