Dailyhunt
शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्.

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्.

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात एका शिक्षकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केला आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.

पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलदीप पांडे (वय ३८) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील पाल राजेंद्र इंग्लिश हायस्कूलमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी शिक्षक कुलदीप पांडे हा पाल राजेंद्र शाळेत गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून गणित विषय शिकवतो. पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून वर्गामध्ये शेवटच्या बेंचवर बसत असे. कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करून तुला काही समजले की नाही, असे विचारत असे. समजले नाही तर मला परत विचार मी तुला सांगेन, असे म्हणून तिच्याशी अश्लील चाळे करत असे. तिने विरोध करूनही हा प्रकार सुरूच राहिला. जुलै महिन्यापासून तर या शिक्षकाने घाणेरडे मेसेज पाठवणे सुरू केले. रात्री फोन करून रात्रीच्या वेळी भेटायला बोलवत असे. तू आली नाहीस, तर तुला दहावीमध्ये नापास करून टाकीन, असे धमकावत असे. दोन-चार दिवसाअगोदर या मुलीला भेटून तू कोणाला काही सांगितलं तर मी तुला ठार मारून टाकेन, असेही त्याने धमकावले होते.

मुलगी घाबरल्यासारखी दिसत असल्याने आईने विश्वासात घेऊन तिला विचारले आणि मुलीने सर्व हकिगत सांगितली. संतापलेल्या आईने मग शाळेत जाऊन कुलदीप पांडे याला दोन चापटा मारल्या. यानंतर शाळेनेही त्याच्याकडून लेखी जबाब घेऊन त्याला नोकरीवरून काढून टाकले. तरीही आरोपी शिक्षकाने मुलीचा छळ सुरूच ठेवला. शेवटी पीडित मुलीच्या आईने समता नगर पोलिस चौकी गाठत तक्रार दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

मुंबईतील शिक्षिकेचे व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

The post शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka