Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल.

सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल.

सोलापूर : सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 18) रात्री उघडकीस आली आहे.

विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. या घटनेमुळे कॉलेज परिसरात तसेच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

विद्याधर हा दररोज रात्री वडिलांना फोन करत असे. मात्र, गुरुवारी रात्री नेहमीच्या वेळेत फोन न आल्याने चिंतेत पडलेल्या वडिलांनी साडेआठच्या सुमारास थेट हॉस्टेल प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीकडे जाऊन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला नसल्याने पुढील तपासणी करताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

विद्याधर ज्या खोलीत राहत होता त्या खोलीतील इतर विद्यार्थी सुट्टीमुळे गावी गेले होते. त्यामुळे तो त्या दिवशी खोलीत एकटाच होता. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर रात्री संपर्क न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोलापूर तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत विद्याधर शिंदे याच्या मागे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू…

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…

सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…

लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka